भुसावळ :– मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्या तीन चार वर्षापासुन रेल्वे स्थानक सुशोभीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने ओघाने कुली बांधवांचे काम कमी झाले व त्यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता कुलीना वा त्यांच्या कुटुंबियाना रेल्वेत काम द्यावे या मुख्य मागणी करिता कुली संघटना आंदोलन करीत आहे. याबाबत वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र याकडे संबंधित लक्ष देत नाही.
कुली वर अन्याय होत असून त्यांना न्याय मिळावा यासह अनेक प्रलंबित मागणी करिता येत्या 23 जुलै 2019 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स डी आर एम कार्यालय एनेक्स बिल्डिंग समोर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे . याआंदोलना दरम्यान बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे याकरिता भुसावळ येथून हजारो कुली बांधव रवाना होणार असल्याचे ऑल इंडिया रेल्वे कुली लाल वर्दी युनियनचे अध्यक्ष साबळे यांनी दिली आहे.
याबाबत भुसावळ डीआरएम यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देते समयी यूनियन अध्यक्ष अनिल सावळे , रफिक शेख मोहीनुद्दीन, तारीख कुरेशी , मोसिन पटेल, रफीक गवली, दस्तगीर शेख, सुनील काकड़े, फकीरा गवली, लुकमान शेख, विजय महादेव, काशीनाथ, , नामदेव, ,हमीद शहा
जावेद पटेल, सलीम खान , -रफीक खान- फ़ीरोज कुरेशी यांच्यासह कुली बांधव उपस्थित होते .