Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी ; ‘या’ कलाकारांनी साधला कंगना राणावतवर निशाणा
    ताज्या बातम्या

    मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी ; ‘या’ कलाकारांनी साधला कंगना राणावतवर निशाणा

    By September 4, 2020No Comments11 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई| दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून अभिनेत्री कंगना राणावत भलतीच आक्रमक झाली असून तिने अनेक धक्कादायक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. बॉलीवूड मधील घराणेशाही,ड्रग माफिया याबद्दल वक्तव्य केलेली कंगना आता थेट मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने आणि मुंबई पोलिसांवर शंका उपस्थित केल्यामुळे कंगणाला सर्वच स्तरातुन रोषाला जावं लागतं आहे. आत्तापर्यंत बॉलीवूड कलाकार किशोरी शहाणे, सुबोध भावे, उर्मिला मातोंडकर यांनी कंगणावर निशाणा साधला आहे.

    महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे, अशा शब्दांत अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला चांगलेच खडसावले आहे.

    या वादात आता अभिनेता रितेश देशमुख यानेही उडी घेतली आहे. रितेश देशमुख याने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. ‘मुंबई हिंदुस्तान है’ असे त्याने म्हटले आहे.

    सई ताम्हणकरने आपल्या ट्विटमध्ये फक्त,’मुंबई मेरी जान!’ असं म्हणतं #कर्मभूमी #ILoveMumbai #विषयसंपला हे हॅशटॅग वापरले आहेत

    कंगनाला चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चांगलेच उत्तर दिले आहे. केदार शिंदे यांनी ट्विट करताना म्हटले आहे, ‘या मुंबईने कित्येक लोकांना डोक्यावर घेतले आणि कित्येकांना पायदळीही तुडवलं! जन्मभूमी कर्मभूमी आहे ही. आई आहे ही. खाऊन भरल्या ताटात…… #निषेध #kanganavirus

    कंगणाच्या या ट्विटवर सुबोध भावेने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. “ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा”, असं सुबोधने कंगनाला सुनावलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    सावकारेंना झालेला ‌‘साक्षात्कार‌’!

    September 8, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif