मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक धोका मुंबईत असून मुंबईत कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असणाऱ्या धारावीमध्ये आणखी कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे धारावीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. दरम्यान परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु असून पोलिसांकडून डॉक्टर बलिगा नगर परिसर सील करण्यात आला आहे. धारावीत करोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकार आणि आरोग्य विभागाची चिंता वाढत आहे.
धारावीतील ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असल्याचं वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं होतं. याच महिलेच्या वडिलांना आणि भावाला करोनाची लागण झाली आहे. धारावीमध्ये आता सापडलेल्या दोन रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या 7 वर पोहोचली आहे. यामध्ये बलिदान नगरमधील 4, वैभव अपार्टमेंटमध्ये 1 डॉक्टर, मुकुंद नगरमध्ये 49 वर्षाचा एक पुरुष आणि मदिना नगरमध्ये 21 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना संदर्भात राज्यातील परिस्थितीचा आढावा आज घेतला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेट मंत्री समवेत चर्चा करणार आहेत. काही कॅबिनेट मंत्री मुंबई बाहेर आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत.