मुंदाणे येथे युवकांची आत्महत्या

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील मुंदाणे येथे २४ वर्षीय युवकांने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. निखिल संजय संदांनशिव (वय २४) असे या मृत युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की,  मुंदाणे येथील निखिल संदांनशिव याने आपल्या राहात्या घरात पंख्याचा कडीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यास खाली उतरवून गावातील ग्रामस्थांनी खाजगी वाहानातुन पारोळा येथील कुटीर रूग्णालयात दाखल केले असता कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश सांळूखे यांनी तपासणी करून मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत मृत संजय संदांनशिव यांचे काका आबा जगन्नाथ संदांनशिव यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कांस्टेबल जयवंत पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.