कामांसाठी मला विधानसभेत प्रश्न विचारण्याची गरज पडली नाही – मा. आ. दिलीप वाघ आमदार किशोर पाटलांवर पुन्हा बरसले
पाचोरा | प्रतिनिधी
मी पत्रकार परिषद घेऊन आमदार किशोर पाटील यांनी सत्यता मांडल्याचा प्रयत्न केला. माझ्या वडिलांनी २५ वर्ष राजकारण केले. यामुळे राजकारणाचे बाळकडू मला घरातुनच मिळालेले असल्याने केवळ विधानसभेत प्रश्न विचारल्यानेच समस्या सुटत नाही. मी सत्ताधारी आघाडी सरकार मध्ये आमदार असल्याने कामांसाठी विधानभवनात मला प्रश्न विचारण्याची गरज पडली नाही. मी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील विधाने आमदार किशोर पाटील यांना चांगलीच झोबंलेली दिसतात. अशी माहिती माजी आमदार दिलीप वाघ यांनी पुन्हा पत्रकार परिषदेचे आयोजन करुन आमदार किशोर पाटील यांच्यावर सरसंधान साधले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, तालुका अध्यक्ष विजय पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे अजहर खान उपस्थित होते.
भडगांव तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून आरोप – प्रत्यारोप करणे सुरू झाले असुन आमदार किशोर पाटील यांनी दि. २२ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी माजी आमदार दिलीप वाघ यांनी दि. २३ रोजी पुन्हा त्यांचे निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करुन आमदार किशोर पाटलांवर सरसंधान साधत खऱ्या अर्थाने जे सत्ताधारी असतात त्यांच्या फक्त शब्दाला आणि पत्रालाही किंमत असते. त्यासाठी मुख्यमंत्री व मंत्र्यांकडुन कोणताही संघर्ष न करता कामे होतात. आमदार पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार होते की विरोधी पक्षाचे ? हे साडेचार वर्ष होवुनही त्यांना ही उमगले नाही. लोकसभा निवडणुकी पर्यंत अख्खी शिवसेना सत्तेत असुनही विरोधी पक्षा सारखी वागली. आणि आत्ता कुठे भाजपाच्या गळ्यात गळा घालून त्यांना सुर आळवायला लागला आहे. पत्रकार परिषदेत माहिती देतांना वाघ यांनी सांगितले की, माझ्या कारकिर्दीतील कामांचा लेखा – जोखा आगामी निवडणुकीत मी मांडणारच आहे. त्यात मी मंजुर केलेल्या किती कामांचे भूमिपूजन व उद्घाटन किशोर पाटील यांनी केले हेही जणते समोर सांगणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची अजुनही वेळ गेलेली नसुन सभागृहात योग्य पध्दतीने आवाज उठविल्यास कमीतकमी हेक्टरी ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेतल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू. याशिवाय आम्ही मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना निवेदन देवुन शेतकऱ्यांच्या पदरात हेक्टरी ५० ते ६०. हजार रुपये मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही साडेचार वर्षात एकही आंदोलन केले नाही. याबाबत उत्तर देतांना वाघ यांनी सांगितले की, आमचा राजकीय प्रवासच आंदोलनाचा आहे. युती सरकारच्या विरोधात कर्जमाफी, दुष्काळ, महागाई, शेतकऱ्यांच्या विजबिलांचा प्रश्न शेतीमालाला योग्य भाव यासाठी सातत्याने साडेचार वर्ष आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. व यापुढेही सर्व सामान्य आणि शेतकऱ्यांसाठी संघर्षाची धार कधीही बोधड होवु देणार नाही या बाबतची ग्वाहीही यावेळी माजी आमदार दिलीप वाघ यांनी यावेळी दिली.