मी नेता नाही ,महाजनांच्या नेतृत्वात काम करायला तयार – आ. एकनाथराव खडसे

0

युती करण्यास भाजप कार्यकर्ते नाखूष ; खडसेंच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांची गर्दी
 जळगाव : जिल्ह्याचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही अशी भूमिका माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना मांडली. दरम्यान मनपा निवडणुकीत युती करू नये असा आग्रह खडसे समर्थकांनी केला आहे . सायंकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते खडसे यांच्या घराबाहेर जमले होते .

महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानावर पत्रकारांशी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ. खडसे म्हणाले की, भाजप सेना युतीची अधिकृत निर्णय अद्याप झालेला नाही, त्यामुळे युतीबाबत बोलणे संयुक्तीक ठरणार नाही. युती संदर्भात निर्णय झाल्यावर मी स्वतः त्याबाबत चर्चा करुन पक्षश्रेष्ठीना विचारणा करेल.महापालिकेची निवडणुकीला अजून महीनाभर लांब आहे. आणि माझ्या हातात अजून बरेच काही आहे, जे अद्याप जनतेसमोर अद्याप येणे बाकी आहे. भाजपा विरोधी पक्षात असतांना गेली २५ ते ३० वर्ष मी एकटा लढलो. अजुनही आपली ताकद कायम आहे. आता तर दिल्ली ते गल्ली आमचीच सत्ता आहे. तसेच जिल्ह्यात दोन मंत्री असतांना युती कशाला याची खंत आहे. परंतू आजही ना. महाजन यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहे. परंतू वाईट प्रवृत्तीला साथ देणार नाही.
युतीबाबत अधिकृत घोषणा नाही.
मनपा निवडणुकीत भाजप आणि खाविआ युती करण्याची तयारी सुरु झाली आहे मात्र अद्याप घोषणा झाली नसली तरी . निवडणुका सुरु होऊ द्या. माझ्या हातात भरपूर काही आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या…’ असे खडसे म्हणाले . दरम्यान पूर्वी कुठलेही पाठबळ नसताना यापूर्वी आपण ३३ नगरसेवक निवडून आणले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष विजयी करून आणला होता . त्यावेळी फक्त एकट्या नाथाभाऊने जळगावात पक्ष वाढविला . भाजपा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत आहे. आमच्याकडे दोन मंत्री आहेत. पक्षाची ताकद आहे. मात्र तरी देखील भाजपा खाविआसोबत युती करण्यासाठी तयार होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.