‘मी कंगनाला ओळखत नाही पण..’ – विक्रम गोखले

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशाच्या स्वातंत्र्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौत हिने देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला. या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले  यांनी तिचं समर्थन केल्याने त्यांच्यावरही टीका होतांना दिसत आहे. यानंतर आज विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

विक्रम गोखले यांनी म्हटलं, आज मी पत्रकार परिषदेत फक्त माझी बाजू मांडत आहे. मी कंगनाला ओळखत नाही आणि तिच्यासोबत मी कामही केलेलं नाहीये. भारतीय नागरिक आणि राजकीय अभ्यासक म्हणून 2014 पासून खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं मत आहे. हे माझं मत मी बदलणार नाही. मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा अवमान केला नाही. 18 मे 2014 चा गार्डियनचा अंक वाचा. त्यात जे होतं ते कंगना बोलली.

कंगना काही चुकीचं बोलली नाही इतकंच मी बोललो असंही विक्रम गोखले म्हणाले. गेले-30-32 वर्ष असलेल्या पक्षांनी पण मला आमच्यात या अशी ऑफर दिली, तुम्हाला काय हवं ते देतो पण मी गेलो नाही. भाजप आणि शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे असंही विक्रम गोखलेंनी खंत व्यक्त केली.

बॉलिवू़ड अभिनेत्री कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील विक्रम गोखले यांनी पाठिंबा दर्शवला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले होते की, होय, कंगना रणावतच्या विधानाशी मी सहमत आहे, त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं होतं.

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही नव्हतो आणि नसेन. सेना-भाजपने मुख्यमंत्रिपद अडिच वर्षांसाठी वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं. होय, सेना भाजपची युती तुटणं ही चूकच आहे, हे स्वत: फडणवीसांनी मान्य केलंय माझ्याशी बोलताना त्यांनीही हे कबुल केलंय असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी केलं होतं.

राज्यात सेना भाजपची युतीचं सरकार येण्यासाठी मी स्वत: उद्धवजींशी बोलेन अस देखील ते यावेळी म्हणाले. तसेच राज्यात महाविकास अघाडीचे सरकार स्थापन होणं हा जनाधाराचा अवमान आहे.आताची सेना ही बाळासाहेबांची नाहीच. हे… आमच्यासारखे लोक सेनेच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नाराज असल्याचे देखील विक्रम गोखले यांनी म्हटलं होतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here