Wednesday, May 18, 2022

मा. नगरसेवक तथा संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणेंवर खंडणीचा गुन्हा

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

  भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद येथे नव्याने टोलनाका काम सुरु झाले. टोलनाक्याचे काम सुरु करु देण्यासाठी येथील माजी नगरसेवक तथा संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शेहवाल समशेर खान यांनी ७ ऑक्टोबरला ही तक्रार दिली होती.

- Advertisement -

दरम्यान, यासंदर्भात सोनवणे यांची ऑडीओ क्लिप सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली असून, यात ते कंपनीच्या अधिकाऱ्याला पाकीट मागत असल्याचा उल्लेख आहे. संघटनांचे आंदोलन करण्यासाठी खर्च येतो, त्यामुळे पाकिट सुरु करण्याची मागणी सोनवणे यांनी टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.

फिर्यादी शेहवाल समशेर खान (वय ४५, रा. जुना नरसिंग नाक्याजवळ, चिनवाडा, उदयपूरा, राजस्थान) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २८ सप्टेंबरला ११ वाजता भुसावळाचे माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी मोबाइलवर कॉल करून टोल नाका चालवू देण्याच्या मोबदल्यात दरमहा पैशांची मागणी केली. मात्र, फिर्यादीने नकार दिल्यानंतर खान तुला बघून घेईल अशी धमकी सोनवणे यांनी दिली.

याप्रकरणी शेहवाल समशेर खान यांनी ७ ऑक्टोबरला ही तक्रार दिली. यावरून नशिराबाद पोलिसांनी सोनवणे यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास भुसावळ उपविभागाचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे करत आहेत. दरम्यान, खंडणीच्या याप्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या