जळगाव, दि.12 –
माहेश्वरी समाजातर्फे महेश जयंती मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आली. समाजातर्फे माहेश्वरी चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. यात घोड्यावर स्वार लहान मुले, भगवान शिवाच्या वेषात सहभागी तरुणी, अमरनाथ येथील बर्फाचे शिवलिंग यांचा समावेश करण्यात आला होता.
महेश जयंतीनिमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर सायंकाळी भगवान महेशची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेचा मार्ग हा माहेश्वरी चौक ते नूतन मराठा महाविद्यालय, कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, फळ गल्ली या मार्गाने माहेश्वरी चौकात सांगता करण्यात आली.