Sunday, May 29, 2022

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाउंट हॅक

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट आज बुधवारी सकाळच्या सुमारास हॅक करण्यात आले. हॅकर्सनी या खात्याचे नाव ‘एलॉन मस्क’ असे ठेवले. त्यावरून ग्रेट जॉब असं ट्विट देखील केलं होतं. याबाबत मंत्रालयानं माहिती दिली आहे. त्यामुळे आता सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

- Advertisement -

हॅकर्सने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं ट्विटर अकाऊंट आज सकाळी हॅक केलं. त्यावरून एक मोठा कार्यक्रम होणार आहे, असं ट्विट केलं. त्यानंतर काही फसव्या लिंक देखील या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल्या होत्या. पण, काही वेळातच मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तसेच हॅकर्सने केलेले ट्विट हटवले.

गेल्या १२ डिसेंबरला पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. मोदींच्या अकाउंटवरून मध्यरात्री २ वाजून ११ मिनिटांनी बीटकॉईन संबंधित एक फसवं ट्विट करण्यात आलं होतं. भारताने बीटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याचं या ट्विटमधून म्हटलं होतं. सरकारने ५०० बीटकॉईनची खरेदी केली असून देशवायिसांना दिले जाईल,असं हे ट्विट होतं. पण, काही वेळातच या अकाऊंटवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं होतं.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या