भडगाव (प्रतिनिधी) : भडगावात प्रशासनातर्फे कोरोना साथीवर खबरदारी म्हणुन 40 बेडचे क्वारंटाईन सेंटर शासकीय ITI येथे तयार केले जात आहे. या अत्यावश्यक कार्यासाठी आज भगवान महावीर जयंतीच निमित्त साधत मास्टरलाईन फाऊंडेशनचा सहभाग म्हणून 8 बेडचा खर्च 20 हजार रुपये भडगावच्या तहसिलदार माधुरी आंधळे यांच्याकडे समीर जैन यांनी सुपुर्द केला. याप्रसंगी सुरेश भंडारी , विजय पारख , शैलेश तोतला , पंकज झवर , शुभम सुराणा आदि उपस्थित होते.


