पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना अद्याप संपलेला नाही, तिसऱ्या लाटेचा आपल्याला कठोर प्रमाणे सामना करायचा आहे, म्हणून बेफिकीरीपणाने वागू नका आणि जर वागलात तर प्रशासन आपल्यावर बारीक नजर ठेवून दंडात्मक कारवाई करेल. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी यापुढे घरातून निघताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई करा अशा सूचना आमदार चिमणराव पाटील यांनी आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीच्या वेळी सांगितले.
आज पारोळा येथील तहसील कार्यालयात आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी एरंडोल विभागीय प्रांत अधिकारी विनय कुमार गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, नगरपालिका मुख्याधिकारी ज्योती भगत, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे, डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी, डॉ. सुनील पारोचे, विठ्ठल वाडकर, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे, शेतकरी संघाचे संचालक चेतन पाटील, डॉ. गौरव कोतकर, डॉ. उर्मिला पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांनी मागील काळात झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा आढावा सांगितला तसेच तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले की, लसीकरणाचा वेग जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावा ग्रामीण भागात अजूनही काही लोकांचे लसीकरण बाकी आहे ते लवकरात लवकर करून घ्यावे, तसेच १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना एक दिवस शाळेत बोलावून त्या ठिकाणी लसीकरण करून घ्यावे तसेच ऑक्सीजन प्लांट विषयी आढावा घेतला.
यावेळी विद्युत कनेक्शन अभावी ऑक्सीजन प्लांट बंद असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार पाटील विद्युत विभागातील संदर्भात तालुक्यातील बहुतांश कामात रस्त्याच्या असो किंवा अन्य त्या ठिकाणी विद्युत विभाग वेळेवर काम करत नसल्याने अडचणी येतात असे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच आपण हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत वेळोवेळी आमची मदत घ्यावी आणि आरोग्य संदर्भातील रखडलेले कामे मार्गी लवावित असे सांगितले.
तसेच प्रांत अधिकारी यांनी सांगितले की, तालुक्यात लसीकरणाचा पहिला डोस हा ७८% नागरिकांनी घेतला आहे दुसरा डोस ४८% नागरिकांनी घेतला आहे व आज पर्यंत १५ ते १८ वयोगटातील तीन हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण केले आहे. तालुक्यात कोरोनाचे सहा रुग्ण ऍक्टिव आहेत व त्यांची ही परिस्थिती ठणठणीत असल्याचे सांगितले तरी देखील बेफिकीरपणाने कोणीही वागू नये असे आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साळुंखे यांनी सांगितले की, या लाटेत कोरोनाची लक्षणे ही सौम्य आढळत आहेत.
जे रुग्ण होते ते जवळपास त्या सर्वांची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले तसेच ऑक्सीजन प्लांट रुग्णांवर उपचारासाठी असलेले औषधी ऑक्सीजन बेड संदर्भात आढावा सांगितला. नगरपालिकेचे पथक व पोलिस पथक दोन्ही मिळून मास्क न वापरणाऱ्या वर संयुक्तपणे दंडात्मक कारवाई करणार आहे. यावेळी येणाऱ्या संभाव्य लाटेचा धोक्याविषयी विविध विषयांवर चर्चा झाली.