Monday, September 26, 2022

मास्क नसल्यास कोणत्याही शासकीय कार्यालयात होणार दंड

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असल्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहे. राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, १८९७ व आपत्ती निवारण कायदा, २००५ ची अंमलबजावणी सुरु आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कोविड १९ प्रादूर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, शारीरिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडून शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोविड-१९ बाधेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला.

या पार्श्वभूमीवर कोविड- १९ बाधेच्या लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी सक्षम प्राधिकारी तसेच अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती यांना मिळालेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आले आहेत….

१) राज्यातील मंत्रालय / अधिनस्त कार्यालय / विधानभवनासह सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येण्याऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल, अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

२) राज्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

३) सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका  अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.

४) सर्व कार्यालये व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी यांना संबंधित अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात / आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.

५) सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत/कर्मचारी/अधिकाऱ्याना दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी ही दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल तसेच आहरण व संवितरण अधिकारी  दंडाची रक्कम शासनाने निश्चित  केलेल्या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.

तरी कोविड- १९ प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत सर्वांनी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या