मालेगाव बॉम्बस्फोटातील ४ आरोपींना जामीन मंजूर

0

मुंबई – २००८ मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील ४ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर  केला आहे. आरोपी लोकेश शर्मा, धन सिंग, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया या यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांच्या याचिकेवर २९ जुलै रोजी न्यायालय सुनावणी घेणार आहे. दरम्यान, मालेगाव स्फोटातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा सुनावणीसाठी कोर्टात हजर राहावे, असे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.