मालमत्ताधारकांचा एक कोटी 25 लाखांचा भरणा

0

जळगाव दि. 29-
महानगरपालिकेतर्फे 30 एप्रिलपर्यंत मालमत्ता करात 10 टक्के सुट दिली आहे. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 30 एप्रिलच्या पूर्वसंध्येला चार प्रभाग मिळून तब्बल 1 कोटी 25 लाखांचा भरणा झाला असल्याची माहिती आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली. यावेळी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, प्रभाग समिती एकचे प्रमुख व्ही. ओ. सोनवणी आदी उपस्थित होते. मालमत्ताकर भरण्यासाठी 30 एप्रिल मंगळवारपर्यंत 10 टक्क्यांची सुट असल्याने नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आले.
महानगरपालिकेचे एप्रिल 2019 मध्ये 10 कोटी रुपये भरण्याचे उद्दिष्ट आहे. महानगरपालिकेतही मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी महानगरपालिकेतर्फे 6 काऊंटर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे श्री. सोनवणी यांनी सांगितले. इतर प्रभाग समिती कार्यालयातही मनपाकडूून मिळालेल्या 10 टक्केच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक उन्हातही गर्दी करत आहेत. दरम्यान सोमवारी प्रभाग समिती 1 मध्ये 47. 83 लाख, प्रभाग समिती 2 मध्ये 18.25 लाख, प्रभाग समिती 3 मध्ये 27.09, प्रभाग 4 मध्ये 32 लाखाचा भरणा नागरिकांकडून करण्यात आला. महानगरपालिका प्रशासनाकडून 70 टक्क्यांपर्यंत उद्दिष्ट पुर्ण झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. रविवारी सुटीचा दिवस असूनही42 लाखांचा भरणा करण्यात आला होता. शनिवारीही प्रशासनाकडून करभरणा सुरु ठेवण्यात आला होता. मनपा प्रशासनाकडून तिनशे जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे समजते.
घंटागाड्या उन्हात तर कार, दुचाक्यांना सावलीचा आधार
मनपा प्रशासनाकडून दोन महिन्यांपुर्वीच 86 घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्या सर्व गाड्या वापराशिवाय मनपा इमारतीच्या आवारात उन्हात उभ्या करण्यात आल्या आहेत. तर मनपा अधिकारी कर्मचारी, नागरिक हे आपल्या कार, दुचाक्या इमारतीच्या सावलीचा आधार घेत लावत आहेत. आपल्या खाजगी गाड्यांसाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र मनपा प्रशासनाने पदरमोड करुन घेतलेल्या गाड्यांची मात्र परवड होत आहे. मनपा इमारतीमागील गाड्यांवर पान गुटख्याच्या पिचकार्‍या मारण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.