मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतूक ठप्प

0

भुसावळ | प्रतिनिधी
येथील रेल्वे यार्डातील मेन लाईनवरील आरओएच डेपो जवळ रेल्वे यार्डातून खंडव्याकडे निघालेल्या मालगाडीचे सात डबे घसरल्याची घटना रविवार १५ रोजी सकाळी ६.५५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामुळे अप-डाऊन लाईनीवरील वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सकाळी ९.३५ वाजेच्या सुमारास अप लाईनीवरील वाहतूक सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले तर डाऊन लाईनीवरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे .
मालगाडीची चाके रेल्वे रूळाखाली घसरल्याने अप-डाऊन रेल्वे मार्गावरील सुमारे दहा पेक्षा अधिक गाड्या प्रभावीत झाल्या. अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर थांबू होत्या तर प्रवाशांची यामुळे चांगलीच गैरसोय झाली. 22139 पुणे-अजनी हमसफर गाडी पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे घेण्यात आली तर 11057 मुंबई-अमृतसर पठाणकोट, 12811 मुंबई-हटीया, भुसावळ-बडनेरा मेमू, 12656 नवजीवन एक्स्प्रेस आदी गाड्या रेल्वे स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या तर अन्य गाड्यांना ठिकठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.