निपाणे ता, एरंडोल ( वार्ताहर) सध्या लॉक डाऊन मुळे मार्केट बंद ठेवण्यात येत असल्याने कांद्याची दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी वर्गाला गावातच अवघ्या चार पाच रुपये किलो दराने कांदा विकावा लागत आहे लावणी पासून खांडणी पर्यंत एका गोणी साठी म्हणजेच ४० किलो साठी लागणारा खर्च काढला तर कमीत कमी ३०० ते ४०० रुपये खर्च येतो आणि आज कांदा फक्त आणि फक्त चार ते पाच रुपये किलो दराने पडत आहे त्यामुळे कांदा उत्पादकशेतकरी वर्ग कर्ज बाजारी होवून अर्थीक संकटात कोलमडला गेला आहे ज्या कांद्याने शेतकरी उत्पादकांच्या तोंडावर हसू फुरवले होते त्याच कांद्याने आज शेतकऱ्यांना रडवले आहे शेती करणे शेतकर्यांचा एक खानदानी धंदा आहे शेती परवडत नसली तरी इकडून तिकडून व्याज ब्याजानेउधार उसनवार सावकाराकडून पैसा ऊभा करुन शेतकरी शेती कसतो त्यातही कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट येवून शेतकऱ्यांचे पार कंबर मोडून टाकते सध्या मार्केट बंद ठेवण्यात येत असल्याने सर्व च शेती मालाची व्यापारी लाथाडी करत आहे कापसाची सिसीआय मार्फत खरेदी सुरु करण्यात आली आहे मात्र तेथे ही क्विंटल मागे चार किलो ची कटटी लावण्यात येत असून अर्धा कापूस पहिल्या ग्रेड मध्ये आणि अर्धा दुसऱ्या ग्रेड मध्ये मोजण्याची मनमानी काही ग्रेडर चालवत आहेत म्हणतात ना शेतकरी दादा भोया यान्हा कोणीभी कापस गया सर्व दूर बळीराज्याची गळचेपी होतांना दिसते शासन माय बाप ने कर्ज मुक्ती करून दिलासा दिला असला तरी नियमित कर्ज फेड करणार्या प्रामाणिक शेतकरी वर्गालाही नुसते आश्र्वासन देवून चालणार नाही तर त्यालाही दिलेल्या आश्र्वासनाची त्वरीत पूर्तता झाली पाहिजे म्हणतातना शेतकरी सुखी तरच जग सुखी कारण तो जगाचा पोशिंदा आहे कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर ही तो घरात राहिला नाही रात्र दिवस काबाडकष्ट करत आहे शासनाने त्यांच्या कष्टाचे सोने करावे तरच शेती आणि शेतकऱ्यांचे नाते टिकून राहिल अन्यथा कर्ज बाजारी होवून एक दिवसआपला जिव कोणत्या ना कोणत्या कारणाने देवाला अर्पण करण्याची वेळ येणार यात शंका नाही