मारुळ गावातील बौद्ध विहार जागेचे भूमिपूजन !

0

यावल:-  तालुक्यातील मारुळ  गांवातील  गेल्या  काही  वर्षांपासुन बौद्ध विहाराकरिता जागेचा ठराव का प्रलंबित होता ,२१फेब्रुवार गुरुवार रोजी ग्रामसभा घेऊन, मारुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्य याच्या उपस्थितीत उषाबाई गावळे यांनी ग्रामसभेत  हा ठराव मंजूर करीत बौद्ध विहाराला जागा उपलब्ध  करुन दिली , सरपंच उषाबाई गावळे यांच्या हस्ते  भूमिपूजन  करण्यात आले.   

रिपाइंचे यावल  युवक तालुकाध्यक्ष संजय तायडे यांनि बौद्ध विहारासाठी वारंवार ग्रामपंचायतिकडे  पाठपुरावा केला होता , यावेळी गावातील  पोलिस पाटील नरेश मासोळे ग्रामपंचायत सदस्य बाळू तायडे, सलीम मेंबर, सय्यद मेंबर,  मामु,  आरपीआय  युवा तालुका अध्यक्ष संजय तायडे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्याचे  आभार मानण्यात आले , प्रमुख मार्गदर्शन संतोष तायडे,यांनी केले आय.टी. सेल तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तायडे,तालुका उपाध्यक्ष पप्पू तायडे,शाखा अध्यक्ष प्रदीप तायडे, वंचित बहुजन आघडीचे युवक तालुका उपाध्यक्ष आकाश तायडे,अतुल तायडे,भूषण तायडे, सुनील गोमे, आकाश तायडे ,समाज सेवक संदीप तायडे ,आनंद तायडे ,काळू तायडे, संदेश तायडे बाळा तायडे सुजित  वाघोदे , विजय तायडे,अरुण तायडे चक्रधर तायडे, आदी उपस्थित होते बौद्ध  समाजबांधवानि  परिश्रम घेऊन वॉल  कंपाउंड केले. 

Leave A Reply

Your email address will not be published.