पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील खाजोळा येथे शेतात बोरींग करण्याच्या कारणावरुन एकास मारहाणीत जखमी केल्या बद्दल पाचोरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दि. २५/०४/२०१९ रोजी सकाळी ९ वाजेसुमारास भोरटेक खुर्द शिवारात फिर्यादी सचिन शामकांत पाटील हा शेतकरी खाजोळा परिसरातील भोरटेक खुर्द शिवारात शेतातील विहरीचे बोरींगचे काम करीत होता . या कामास निलेश हिरामण पाटील, हिरामण भिकारी पाटील, भारत भिकारी पाटील सर्व राहणार खाजोळा तालुका पाचोरा यांनी फिर्यादीस लोखंडी पहार व लाकडी दाड्यांने यांनी फिर्यादीस शिवीगाळ करून त्याचे हात पकडुन लोखंडी पहार डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. व फिर्यादीचे वडील शामकांत बिरारी पाटील यांनाही लाकडी काठीने मारहाण केली. जखमीस चाळीसगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थसाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर मारहाण व दुखापत प्रकरणी आरोपी विरोधात पाचोरा पोलिसात भाग ५ गुरनं / २०१९ भादवि कलम ३०७, ३२३,३२४,५०४,५०६ ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.यातील आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असुन पुढील तपास सुरू आह