उत्तर प्रदेश :- उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज समाजवादी पक्षासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशच्या निकालाकडे पाहिले तर समाजवादी पार्टीचा मुख्य मतदार असलेल्या यादव समाजाने पक्षाला साथ दिलेली नाही. सपाच्या बलाढय उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला असे मायावतींनी सांगितले.

दरम्यान मायावती यांनी आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुका मधील असमाधानकारक कामगिरीनंतर बहुजन समाज पक्षाची ची दिल्लीतील कार्यालयात एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये समाजवादी पक्ष ‘यादव’ मतं मिळवण्यात निष्फळ ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. लोकसभा निवडणुकांच्या बाबतीतील या करणीमिमांसेनंतर बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्ष सोबत काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र भविष्यात अखिलेश यादव यादव मतांना आकर्षित करू शकले तर सपा-बसपा आघाडी पुन्हा एकदा पहायला मिळू शकते हे असं देखील मायावती यांनी म्हटलं आहे.

