मायावतींच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात तक्रार

0

निवडणूक आयोगाने मागितला अहवाल

नवी दिल्ली :- बसपाच्या प्रमुख मायावती यांची उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद येथे महाआघाडीची पहिली सभा रविवारी झाली. सभेदरम्यान मायावती यांनी आपल्या भाषणात ‘मुस्लीम’ शब्दाचा वापर केल्यामुळे येथील जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश देत निवडणूक आयोगाने अहवाल मागितला आहे. ‘मुस्लिमांनो, काँग्रेस भाजपाला टक्कर देऊ शकत नाही, फक्त महाआघाडीच भाजपाचा पराभव करु शकते. मतविभाजन टाळून महाआघाडीला एकगठ्ठा मते द्यावीत असे वक्तव्य मायावतींनी केले होते.

दरम्यान, मायावती यांच्या या विधानाविरोधात अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून अहवाल मागितला आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी वेंकटेश्वर लू यांनी सांगितले.

याचबरोबर, कालच्या सभेत आता चौकीदाराला चौकीतून हटवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. निवडणुकीआधी हे चौकीदार झाले आहेत. आता एका-एका चौकीदाराची चौकी काढून घेण्याचे काम आम्ही निवडणुकीत करू, अशा शब्दांमध्ये अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर हल्लाबोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.