माध्यमिक विद्यालय सार्वे बाभळे शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

0

पारोळा (प्रतिनिधी) : ज्ञानदीप बहुद्देशीय विद्याप्रसारक मंडळ तामसवाडी संचलित माध्यमिक विद्यालय सारवें बाभले शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांचां स्वागत उत्स्फूर्तपणे करण्यात आला .गेल्या दहा महिन्यापासून कोरोना च्या संकटामुळे शाळा बंद होत्या .बरेच्या दीर्घकाळाने शाळा सुरू झाली.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत शाळेला विविध रंग च्या फुग्यानी ची आरास करून  सजवले  तसेच संपूर्ण शाळेला सनीटेझेर ची फवारणी करून त्यानंतर  प्रत्येक विद्यार्थ्यांना थर्मल स्कॅनिंग plusoximitar मोजून तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना सॅनिटाझर करून वर्गात प्रवेश देण्यात आला.

त्यानंतर ज्ञानदीप संस्थेच्या अध्यक्ष भैय्यासाहेब पवार व शाळेचे मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी प्रत्येक  विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट  देवून स्वागत केले .विद्यार्थ्यांना चे स्वागत करण्याच्या प्रमुख उद्देश की विद्यार्थ्यी दीर्घकाळा नंतर शाळेत येत आहेत त्यांना शाळेची आवड निर्माण होऊन शाळेत नियमित यावे हा उद्देश आहे असे भैय्यासाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले तसेच विद्यार्थ्यांना कोरोना आजार विषय मार्गदर्शन केले. या स्वागत समारंभ ला शाळेचे कर्मचारी आर पी साळुंखे,बी एस निकुंभ,एस ए पाटील,के ये सोनवणे,एच एच पाटील ऐन एस पाटील एस एस पाटील,एम एच श्रीगणेश उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.