मातांनो अतिरेकी मार्गावरील मुलांना शरण येण्यास सांगावे

0

जम्मू- काश्मीर :- जम्मू- काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैन्य आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. ”दहशतवादाच्या मार्गावर जाणाऱ्या तुमच्या मुलांना योग्य-अयोग्य काय याची जाणीव करून देत हा मार्ग सोडून शरण येण्यास सांगावे, असे आवाहन करण्यात आले. आम्ही राज्यातील सर्व मातांना विनंती करीत आहे की, तुमची मुलं दहशतवादी मार्गाकडे वळली असतील तर त्यांना सुरक्षा दलांसमोर समर्पण करण्यास सांगा, नाहीतर जो हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच, असे असे सैन्याचे लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी ठणकावले आहे. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी श्रीनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून दहशतवाद्यांना कडक इशारा देण्यात आला.

14 फेब्रुवारी पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला हा पुलवामा येथील रहिवासी आदिल दार या दहशतवाद्याने केला होता. आदिल हा मार्च २०१८ मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या १०० तासांच्या आत आम्ही जैश- ए- मोहम्मदच्या काश्मीरमधील कमांडरचा चकमकीत खात्मा केला, अशी माहिती लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी दिली.


 

Leave A Reply

Your email address will not be published.