मातंग समाजास हक्काचे सभागृह मिळण्यासाठी लहुजी संघर्ष सेनेचे आमदार किशोर पाटील यांना निवेदन

0

पाचोरा |  प्रतिनिधी

पाचोरा शहरामध्ये मातंग समाज जास्तीत जास्त प्रमाणात असुन सुध्दा अद्याप पर्यंत मातंग समाजाला कुठल्याही प्रकारचे सामाजिक

सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रमासाठी सभागृह नाही. लहुजी संघर्ष सेना, पाचोरा तर्फे दि. २८ सप्टेंबर २०१८  नगरपालिका मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देवुन मातंग समाज हा सभागृहाची मागणी केली आहे. अद्याप पर्यंत मागणी पुर्ण झालेली नाही. तसेच मातंग समाज हा दरवर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑगस्ट महिन्यात साजरी करीत असतो. आणि पावसाळ्याचे दिवस असल्या कारणामुळे दुरअवस्था होते. तरी आपल्या नगर पालिका हद्दीतील व नगर परिषद पाचोरा यांच्या मालकीची इमला जागा क्रं.२. ७५३९० पैकी असुन ही जागा देविदास सुकदेव चौधरी, श्रीराम नगर, पाचोरा यांच्या घराच्या बाजुला आहे. ह्या इमला जागेवर मातंग समाजाच्या हितासाठी मातंग सामाजाला आपल्या आमदार निधीतुन सभागृह बांधुन देण्यात यावे. अशी मागणी लहुजी संघर्ष सेनेतर्फे आमदार किशोर पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज दि. १ जुले रोजी आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी लहुजी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते मधुकर अहिरे, जिल्हा अध्यक्ष नाना भालेराव, जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) सुकदेव आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार, तालुका अध्यक्ष पांडुरंग अवघडे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष स्वप्निल सपकाळे, शहर अध्यक्ष गोपाल अहिरे,  अनिल आव्हाड, समाधान बोराडे, राजेंद्र चव्हाण, चेतन चव्हाण, सुभाष पगारे, ईश्वर अहिरे, किशोर बाविस्कर, प्रकाश कोतकर यांचेसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.