नंदुरबार : – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव गावित यांचे स्विय सहाय्यक भगवानसिंह गिरासे यांनी आज (शुक्रवार) गळफास घेऊन आत्महत्त्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नवापूर व नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.
भगवान गिरासे हे मुंबईहून बेपत्ता झाले होते. 1 एप्रिल रोजी अत्यंत नाट्यमयरीत्या गुजरात राज्यातील उच्छल रेल्वे स्टेशन वरून घरी परतले होते. चार दिवसापासून ते कोणाजवळ काहीही बोलत नव्हते परिवारासोबत देखील ते बोलत नव्हते. अशातच आज सकाळी त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या परिवारातील सदस्यांना ही घटना लक्षात आली असता त्यांना पकडले दोरी कापली आणि तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे आता त्यांच्या बेपत्ता प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
अनेक वर्षांपासून भगवानसिंह रामचंद्र गिरासे हे जेष्ठ नेते माणिकराव गवित यांच्यासोबत स्वीय सहायक म्हणून काम करत आहेत. तसेच नवापूर येथील शाळेत शिपाई म्हणूनही कार्यरत आहेत