पाचोरा (प्रतिनिधी) : शहरासह ग्रामीण भागात ही कोरोना आजाराच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दैनंदीन मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वकांक्षी अशी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या अभियानाची सुरुवात दि. १५ सप्टेंबर पासुन संपूर्ण राज्यात सुरु केली आहे.
याबाबत आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थानी “शिवालय” कार्यालयात पाचोरा – भडगाव मतदार संघातील युवासेनेचे बुथ प्रमुख, शाखा प्रमुख, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन संबंधितांना पाचोरा – भडगाव मतदार संघातील प्रत्येक गावात जावुन कोरोना बाबत जनजागृती करावी. अशा सुचना देण्यात आल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली. सदर बैठकीस जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, दिपकसिंग राजपुत, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, उद्धव मराठे, गणेश परदेशी, भडगाव न. पा. चे माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, स्विय्य सहाय्यक राजेश पाटील, नाना वाघ, जितेंद्र पेंढारकर सह पाचोरा – भडगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोना या महामारीने ग्रामिण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर मात मिळविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
कोरोना पासुन स्वत:ला वाचविण्यासाठी सतत मास्क घालुन रहावे, मास्क शिवाय घराबाहेर पडु नये, दर दोन ते तीन तासांनी हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावे, नाक, तोंड व डोळ्यांना नियमित हात लावु नये, सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पणे पालन करावे, ९८.७ पेक्षा जास्त तापमान असल्यास त्वरीत ताप तपासणी केंद्रात जावुन तपासणी करावी. याबाबत पाचोरा – भडगाव तालुक्यातील प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरात कोरोना बाबत नागरिकांना काळजी घेण्याबाबतच्या सुचनांचे पत्रक देण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती बैठकीनंतर आमदार किशोर पाटील यांनी त्यांचे निवासस्थानी “शिवालय” कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.