`माझी वसुंधराʼअभियानाअंतर्गत पहूर पेठ येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी घेतली शपथ

0

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) : पहूर पेठ येथे माझी वसुंधरा अभियानात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून अंगणवाडी कोड क्रमांक ९ मध्ये सुषमा सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शपथ घेण्यात आली.

यावेळी पर्यवेक्षीका पुष्पा धनगर , सिंधू भट, वंदना खैरनार, अर्चना पाटील, नर्मदा बेलपत्रे, पुष्पा घोलप, रेखा तायडे ,शारदा कुयटे ,सुलोचना मोरे ,निर्गुणा चव्हाण, संगीता बारी यांच्या सह सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल सरपंच नीताताई पाटील ,उपसरपंच शाम सावळे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आज सायकल रॅली –

प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी आज रविवारी सकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर पेठ येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सायकल धारकांनी सहभागी होण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सभापती राजधर पांढरे यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.