माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती – नितीश कुमार

0

पाटणा (वृत्तसंस्था ) ;- राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) नेतेपदी निवड जेडीयूचे नेते नितीश कुमार यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयारीही सुरु झाली आहे. सोमवारी नितीश कुमार यांचा शपथविधी पार पडणार असून त्याआधी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती असा खुलासा नितीश कुमार यांनी केला आहे.

बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी सरकार स्थापनेसाठी नितीश कुमार यांना निमंत्रण दिलं आहे. नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. भाजापमधून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावं असं मला वाटत होतं. पण भाजपाने केलेल्या आग्रखातर मी मुख्यमंत्री होत आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.