माझगावच्या जीएसटी भवनाला भीषण आग !

0

माझगाव : मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शर्थीने सुरु आहे.  लेव्हल थ्री ची आग लागल्याचं अग्निशमन दलाने म्हटलं आहे. म्हणजेच ही आग गंभीर स्वरुपाची आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जीएसटी भवनच्या बाजूला अनेक सरकारी कार्यालये आहेत. आग आटोक्यात यावी यासाठी प्रचंड प्रयत्न सुरु आहेत. ही आग जीएसटी भवनच्या आठव्या मजल्यावर लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जीएसटी भवनात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आहेत. आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची भीती वर्तवली जात आहे. इमारतीत फर्निचर आणि लाकडी सामानही भरपूर असल्यामुळे आग वाढत आहे. दरम्यान, जीएसटी भवनात कुणीही अडकले नसल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.