वाकडीतील त्या ग्रापसदस्याचे अपहरण : घातपाताचा संशय
पहूर ता जामनेर ,दि.24-
वाकडी ता जामनेर येथील विनोद लक्ष्मण चांदणे हा ग्रामपंचायत मध्ये एकमेव मातंग समाजाचा सदस्य असून ग्रामपंचायत मध्ये चालणार्या गैरव्यवहाराला विरोध करीत होता. या कारणावरुन वाकडीतील माजी सरंपंचासह तीन जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीसात चार दिवसानंतर संबधीतांविरूध्द गुन्हा दाखल के ला आहे. मात्र हा घातपाताचा प्रकार असल्याचे समोर येत आहे.
विनोद लक्ष्मण चांदणे हा दि 19 मंगळवार रोजी सकाळी न ऊ पासून संक्षयास्पद बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विजय लक्ष्मण चादणे यांनी बेपत्ता झाल्याची नोंद पहूर पोलीसात करून घातपात केल्याचा संशय व्यक्त केला होता. तर तीन संशयितांची नावे दिली होती. यात माजी सरंपच विद्यमान सदस्य चंद्रशेखर पदमाकर वाणी यांच्या नावाचा समावेश होतो.माजी सरंपंच चंद्रशेखर वाणी हा प्रमुख सूत्रधार असून त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी राजेंद्र लक्ष्मण चांदणे यांनी पोलीसांकडे मागणी लावून धरली होती.
अपहरण ,कटकारस्थान,
अट्रासिटी गुन्हा
मंगळवार दि 19रोजी विनोद लक्ष्मण चांदणे नेहमी प्रमाणे सकाळी न ऊ वाजता घरून निघाला. माजी सरंपच चंद्र शेखर वाणी, नामदार तडवी,विनोद देशमुख ( रा वाकडी) व महेंद्र राजपूत (रा शेळगाव तळेगाव)या चौघांनी वाकडी धरणाच्या भिंती जवळ कट रचून विनोद ची दुचाकी आडवीली.त्याला जबर दुखापत करून त्याला जिवे ठार मारण्यासाठी अपहरण केले आहे. असे विनोद चा भाऊ राजेंद्र लक्ष्मण चांदणे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. त्यावरून वरील संबंधित चौघांविरूध्द भादवी.363,364,120 ब,341,अट्रासिटी3(2)व्ही प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेंद राजपूत, विनोद देशमुख व नामदार तडवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.तर माजी सरपंच चंद्र शेखर वाणी यापूर्वी ही तीन गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपास डिवाएसपी ईश्वर कातकडे व सपोनि दिलीप शिरसाट करीत आहे.तसेच चंद्र शेखर वाणीच्या अटकेकडे लक्ष लागून आहे.
तपासाचे आव्हान
पाचोरा विभागाचे डिवाएसपी ईश्वर कातकडे व साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी तपासाची खबरदारी घेत असून दरोरोज वाकडी त संशयितांना घेऊन चौकशी व विचार पूस करण्यात येत आहे.या तपासाचे आव्हान आहे.