पाचोरा – श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, पाचोरा येथे दि. १२ फेब्रुवारी रोजी बेंगलोरच्या नॅक येथुन तज्ञ समिती महाविद्यालय परीक्षणसाठी येणार आहे व आपल्या महाविद्यालयाला मानांकन (ग्रेड) देणार आहे. नॅक तज्ञ समिती समवेत आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी – विद्यार्थिनींची व पालक यांच्या सहविचार सभेचे आयोजन दि. १२ फेब्रूवारी २०२० रोजी दुपारी २:३० वाजता करण्यात आलेले आहे.
आपल्या महाविद्यालयातील माजी विद्यार्थी राजनीती, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, न्यायालयीन, प्रशासनिक, व्यवसाय व इतर विविध क्षेत्रात सर्वोत्तम सेवा देत आहेत व महाविद्यालयाचे नावलौकिक करीत आहेत. आपण सर्वानी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले. ज्या ठिकाणच्या आपण आपल्या आयुष्यातील खुप चांगल्या स्मृति जपून ठेवल्या त्या महाविद्यालयासाठी आपण वेळ द्यावा व नॅक समिती सोबतच्या बैठकीसाठी १२ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी २:३० वाजता आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहावे व आपल्या महाविद्यालयाला चांगली ग्रेड मिळेल या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.