Sunday, May 29, 2022

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत इतर मागासवर्ग या प्रवर्गातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी  जिल्हा बँक संचालकपदासाठीच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे.

- Advertisement -

इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या विरोेधात जिल्हा बँक संचालक संजय पवार यांचे बंधू विकास मुरलीधर पवार हे उभे होते. यानंतर विकास पवार यांच्या पुढाकाराने शेतकरी पॅनल आकारास आले. या पॅनलच्या माध्यमातून त्यांनी सहकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना अपयश आल्याचे दिसून आले. या पॅनलच्या एकही उमेदवाराला विजय मिळविता आला नाही. याच प्रमाणे माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील यांनी देखील विकास पवार यांना पराभूत करून जिल्हा बँक संचालकपदी निवडून येण्याचा आपला क्रम कायम ठेवला आहे.

आज झालेल्या मतमोजणीत डॉ. सतीश पाटील यांना २३१६ तर त्यांचे विरोधक विकास पवार यांना १४२ मते मिळाली.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या