एरंडोल (प्रतिनीधी) : देशात कोरोनाचे महाभयंकर संकट आलेले असुन या संकटा सोबत जिकराची लढाई करणारे योद्धे डॉक्टर, पोलीस व मेडिकल वाले हे आहेत व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असुन त्यासाठी त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉग्रेस वेल्फेअर व जळगांव जिल्हाचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांच्यावतीने डॉक्टर, मेडीकलवाले, पोलीस कर्मचारी यांना मोफत पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस डॉ राजेंद्र देसले,जिल्हासरचिटणीस डॉ सुभाष पाटील, कासोदा सरपंच भैय्या राक्षे, जिल्हासरचिटणीस मुख्तारसर, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तालुकाध्क्ष संदीप वाघ, कासोदा शहराध्यक्ष अजीज बारी,समद कुरेशी, एन.डी.पाटील, दत्तू पाटील उपस्थीत होते.