माजी मंत्री गिरीष महाजनांची गोर-गरिबांसाठी मदतीचा आधार

0

जामनेर( प्रतिनिधी): – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील गोर,गरीब वंचितांची परवड होत असताना, या भीषण संकटात माजी मंत्री आमदार गिरीष महाजन हे पुढे सरसावले असून त्यांनी या बाधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आ. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांन मार्फत तालुक्यातील गरजुंपर्यंत घरपोच मदत पोहोचविली जात आहे. त्यातफुड पॅकेट, वैद्यकीय सेवा, धान्य किट यांचा समावेश आहे.

शहरातील  पाचोरा रोड भागातील बाबाजी राघो मंगल कार्यालय सकाळी व संध्याकाळी दोन्हीं वेळेचे जेवण बनून पॅकिंग करून सुमारे 3000 फुड पॅकेट यात सात्विक भाजी, पोळी खिचडीचा समावेश असलेले जेवण कार्यकर्ते गरजुंपर्यंत घरपोच अत्यंत शिस्तीने, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाजपा कार्यकर्ते स्वतःच्या वाहनाने पोहचवितआहे.तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात भाजपा व ABVP यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णवाहिकासह डॉक्टरांचे पथक घेऊन स्थानिक कार्यकर्ते यांच्या मदतीने प्रत्येक गावात जाऊन रुग्णांची तपासणी करीत आहेत व कोरोणाचा मुकाबला करण्यासाठी मास्क व स्यानीटाइझरचे वाटप करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील गरजुंपर्यंत घरपोच धान्याचे किट वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ,तेल, साखर,हळद, मीठ मिरची या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते यांच्या मार्फत घरपोच वाटप करण्याचा मानस असून 10 ते 12 हजार किट तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे वितरण करण्यात येणार आहे.वरील सर्व उपक्रमात व मदत कार्यात आ. गिरीष महाजन यांचे सर्वस्वी व मनस्वी सहकार्य असून शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी मेहनत घेत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संकटाच्या वेळी आ. गिरीष महाजन गरिबांसाठी आधार दुत ठरत असल्याची भावना तालुक्यात व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.