अमळनेर :(प्रतिनिधी) : राज्याचे माजी आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर येथे येऊन तालुक्याचा आढावा घेऊन डॉक्टरांसाठी 185 किट आणि 200 लिटर सॅनिटायझर दिल्याने डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
अमळनेर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार स्मिता वाघ यांना बोलावून प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीस प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, डॉ अनिल शिंदे, डॉ संदीप जोशी ,डॉ नितीन पाटील, डॉ गिरीश गोसावी, माजी सभापती श्याम अहिरे , डॉ चंद्रकांत पाटील, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, राकेश पाटील, चंद्रकांत कंखरे, राहुल चौधरी हजर होते.
यावेळी गिरीश महाजन यांनी रुग्ण का वाढत आहेत याची विचारपूस केली त्यावेळी प्रशासन आणि डॉक्टरांनी सांगितले की अमळनेर शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांचे स्वॅब घेतले जात असून लक्षणे नसली तरी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे तपासणी संख्या जास्त असल्यानेच रुग्ण देखील जास्त दिसत आहेत परंतु ते विशिष्ट झोन मधीलच आहेत आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तसेच काय अपूर्णता आहे असे विचारल्यावर डॉक्टरांनी जास्त लोक असल्यामुळे पीपीइ किट आणि दवाखाने किंवा कोविड सेंटर स्वच्छ करण्यासाठी सॅनियझरची आवश्यकता असल्याचे संगीतल्यानन्तर गिरीश महाजन यांनी 185 पीपीई किट आनि 200 लिटर सॅनिटायझर दिले तसेच येत्या दोन दिवसात जिल्ह्यासाठी 5000 पीपीई किट मागवले आहेत. त्यातून आणखी अमळनेर साठी देईल असे सांगितले. मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असेल तर त्यांना देखील बोलावून घेतो अशी तयारी महाजन यांनी दाखवली होती. मात्र, स्थानिक डॉक्टरांनी सध्या त्याची गरज नसल्याचे सांगितले. मात्र जोखमीने रुग्णांचा स्वॅब घेणाऱ्या डॉक्टरांना पीपीई किट मिळाल्याने दिलासा मिळाला आहे.