Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»माजी मंत्री गिरीश महाजनाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    माजी मंत्री गिरीश महाजनाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

    By January 5, 2021Updated:January 5, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव विद्या प्रसारकाच्या संचालकांना डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर असून  संचालकाला मारहाण करून खंडणी मगितल्याचा आरोपाखाली त्यांच्यावर  कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप

    जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमध्ये वाद आहे. काल रात्री गिरीश महाजन यांनी मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

    दरम्यान, पाच वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत तानाजी भोईटे यांच्या गटाला नरेंद्र भास्कर पाटील यांनी निवडणुकीत पायउतार केल्यानंतरही भोईटे गट संस्थेवर ताबा सांगत असून दोन्ही गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. मध्यल्या काळात भोईटे गटाला महाजन यांचा पाठींबा असल्याची चर्चा होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भोईटे गटाने विजय पाटील यांना पुण्यात बोलावून चाकुचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच याचवेळी व्हिडिओ कॉलवरुन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी एका कोटी रुपयांची ऑफर दिली. जानेवारी 2018 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी 8 डिसेंबर 2020 रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात गिरीष महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने महाजन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.हाजन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.