माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण

0

जळगाव ;– जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती . आता माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते उपचारासाठी आज मुंबईला रवाना होत असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी लोकशाहीशी बोलताना दिली . तसेच एकनाथराव खडसे यांनी माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी तसेच कुणीही मी बरा झाल्याशिवाय भेटीला येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.