भुसावळ :- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य व खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे विजय मोतीराम चौधरी यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
विजय चौधरी हे माजी आमदार संतोष चौधरी यांचे अतिशय निकटवर्तीय असल्याने अनेक तर्क वितर्क सुरू आहे.
आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ना.नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज दिनांक 16 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.