Saturday, January 28, 2023

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खुलं पत्रं; वाचा सविस्तर

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

बऱ्याच  दिवसांपासून गायब असलेले माजी गृहमंत्रीअनिल देशमुख अखेर आज ईडीसमोर हजर राहिले. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ ट्विट करून आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर त्यांनी एक पत्रंही पोस्ट केलं आहे. हे पत्रं कोणताही मंत्री, नेता, तपास यंत्रणा किंवा जनतेला उद्देशून नाही.

देशमुखांनी पोस्ट केलेलं पत्र  

- Advertisement -

मी माझं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी समर्पित केलं आहे. कायद्याच्या चौकटीत राहून मी आयुष्य जगलो आहे. त्यामुळेच माझ्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणतेही आरोप झालेले नाहीत. माझं आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखं आहे. त्यात काहीच लपवून ठेवलेलं नाही.

परंतु, माझ्यावर काही लोकांकडून आरोप झाले. ज्यांची काहीच नैतिकता किंवा विश्वासहार्यता नाही अशा लोकांनी माझ्यावर आरोप केले. काही तरी हितसंबंधातून हेतूपरत्वे हे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप खोटे आहेत. ज्या व्यक्तीने हे आरोप केला, तोच कर्तव्यावर असताना खंडणी वसूल करायचा. फ्रॉड करायचा आणि खुनाच्या गुन्ह्यातही असल्याचं दिसून येतं. तर माझ्यावर आरोप करणारा मुंबईचा माजी पोलीस आयुक्तच एका प्रकरणात फरार आहे.

भारतीय नागरिक म्हणून मी नेहमीच संविधानाचं पालन केलं आहे. संविधानाच्या अनुच्छेद 21चा मी नेहमीच आदर केला आहे. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात माझी याचिका सुनावणीसाठी असतानाही त्यापूर्वीच मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे.

मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम दिलासा दिलेला आहे. माझी चौकशी सुरू असताना माझा वकील माझ्या सोबत राहील. वकिलाच्या समक्षच माझं म्हणणं नोंदवलं जाईल, तसेच जर गरज असेल तर मला अटकपूर्व जामीन देण्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. यात कुणाचे तरी वेस्टेड इंट्रेस्ट आहेत. मात्र, या सर्वांकडे दुर्लक्ष करून ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझ्याविरोधात सुरू असलेला प्रचार निराधार आहे. माझ्यावर झालेले आरोप हे निराधार आहेत. हे मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे. माझी चौकशी अत्यंत निष्पक्षपातीपणे होईल अशी आशा आहे. मी चौकशीला संपूर्णपणे सहाकार्य करेन, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच सत्यमेव जयते म्हणून त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे