नवी दिल्ली: नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अरूण जेटली यांचे आज दुपारी निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे त्यांना ९ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर ‘एम्स’मध्ये उपचार सुरू होता. मात्र, उपचार सुरू असताना आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. . जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे.
Delhi: Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS pic.twitter.com/OTDwN7sM0w
— ANI (@ANI) २४ ऑगस्ट, २०१९
अरुण जेटली गेल्या दोन वर्षांपासून आजारी होते. जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ होती. त्यावर उपचार करण्यासाठी ते न्यूयॉर्कलाही गेले होते. त्याआधी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
भाजपाने २०१९ ची निवडणूक जिंकल्यानंतर पत्र लिहून जेटलींनी आपला मंत्रिमंडळात समावेश करु नये अशी विनंती केली. मोदींनीही ती मान्य केली. “गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये,” असं स्वत: जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.अरुण जेटली यांनी विरोधी पक्षनेता, अर्थमंत्री, कायदेमंत्री, आणि जलवाहतूक मंत्री यांसारखी अनेक महत्त्वाचे मंत्रीपद सांभाळली.