माजी कुलगुरू डॉक्टर मेश्राम यांचे निधन

0

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे  माजी कुलगुरू डॉ•सुधीरजी मेश्राम यांचे निधन झाले आहे. नागपूर येथील अवंती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ते गेली १५ दिवस दाखल होते. आज दुपारी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. डॉ. सुधीर मेश्राम यांच्या रूपाने एक कर्तबगार व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. 

 

डॉ. सुधीर मेश्राम हे ८ सप्टेंबर २०११ ते ७ सप्टेंबर २०१६ या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते.   अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मायक्रो-बायोलॉजीत एम.एस्सी. आणि नंतर पीएच.डी. पूर्ण केली. ते नागपुर विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभागप्रमुख होते. त्यांनी या विषयात सखोल संशोधन केले होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते. तर त्यांनी आपल्या संशोधनाचे काही पेटंट सुध्दा मिळविले होते.

 

यानंतर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू बनले. त्यांच्या काळात विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रयोगशाळा ते जमीन हा प्रयोग देश पातळीवर वाखाणण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.