भुसावळ (प्रतिनिधी)– येथील टिंबर मार्केट मधील सर्वोदय छात्रालय येथे अनधिकृत बांधकाम तपासणीसाठी मुख्याधिकारी व त्यांच्यासोबत पालिकेचे कर्मचारी 14 रोजी सायंकाळी गेले असता या दरम्यान माजी आमदार यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना अश्लील शिवीगाळ करून अंगावर धावून गेले.
याबाबत मुख्याधिकारी यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला व अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी फिर्याद दिल्यावरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात माजी आमदार संतोष चौधरी विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास एपीआय मंगेश गोठला हे करीत आहे.

