Sunday, May 29, 2022

माजी आ. संतोष चौधरींची याचिका न्यायालयाने फेटाळली

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

माजी आमदार संतोष चौधरी यांनी जिल्हा बँक निवडणुकीतील अर्ज फेटाळल्याच्या विरोधात खंडपीठात धाव घेतली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळला  आहे.

- Advertisement -

माजी आ. संतोष चौधरी यांनी भुसावळ तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व संयुक्त शेती संस्था या मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षा भोगल्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत नामंजूर झाला. यामुळे चौधरींनी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग यांच्याकडे अपील दाखल केले होते. तेथे चौधरी यांना दिलासा न मिळता त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आली.

दरम्यान,  संतोष चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. मात्र खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावली. कर्मवीर तुलसीराम औताडे विरूद्ध राज्य निवडणूक आयोग २०२१(२) या केसचा आधार देत तांत्रिक मुद्द्यावर गुणवत्तेच्या आधारावर मेंटेनेबल नाही, असे स्पष्ट करत भविष्यात इलेक्शन पीटिशन करु शकतात, असे निर्देश देत याचिका फेटाळून लावली आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या