माजी आमदार डॉ. बी एस पाटलांकडून एक लाखाची मदत

0

अमळनेर : देशात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, त्याचा प्रसार थांबविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून युध्द पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा या वैश्विक संकटाच्या काळात शासन व प्रशासनाला पुर्णपणे सहकार्य करणे अतिशय गरजेचे आहे. अशातच माजी आमदार डॉ. बी एस पाटील कोरोनाग्रस्तांसाठी रुग्णसेवा देण्या बरोबरच एक लाखाची मदत ही दिली आहे.

यापूर्वी डॉ.बी.एस.पाटील ह्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये स्टेट बँक अमळनेर द्वारा एक लाख रुपयांची मदत कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केली आहे.  ह्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये जनतेने आपण समाजाचे काही देणे लागतो. ह्या भावनेतून ज्याला जेवढे शक्य या ना त्या स्वरुपात मदतीचा हात पुढे करावा असे नम्र आवाहनही डॉ. पाटील यांनी केले आहे. ते विविध सामाजिक उपक्रमामध्ये नेहमीच सहभागी होत असतात. विशेष म्हणजे ते अनेक विषयांवर प्रवचन ही करीत असून जनजागृती करण्याचे काम करतात.

माजी आमदार डॉ. पाटील हे स्वतःचा दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी राज्यात कुठेही जाण्यास तयार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला डॉ. बी. एस. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री यांच्या कडे ई-मेल द्वारे नावही नोंदवले आहे. डॉ पाटील हे खान्देशातील ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ असून गेल्या 15  वर्षांपासून शहरात खासगी प्रॅक्टिस करीत आहेत. स्वतःचा दवाखाना बंद करून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी अनुभवी डॉक्टर म्हणून राज्यात कुठेही शासनाच्या निर्णयानुसार कोठेही सेवा देण्यास तयारी दर्शवली आहे. डॉ. पाटील यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.