चोपडा | प्रतिनिधी
तालुक्यातील माचले येथे ग्रामीण कार्यानुभव उपक्रमा साठी कृषिदुतांचे आगमन झाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत नवल भाऊ कृषी विद्यापीठ अमळनेर येथील विद्यार्थी रोशन मोरे,मनीष भादने, हर्षा रेड्डी,संजू रेड्डी ,निलेश राजपूत,प्रशांत भादाने,विष्णु गोपाल,रोहित शिरसाठ,हे पुढील काही महिने गावात राहून आढावा घेतील व गावातील शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेतील. या वेळी सरपंच सौ सिंधूबाई कोळी, उपसरपंच संतोष पाटील , योगेश सपकाळे,घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, गुलाब पाटील आणि ग्रामसेवक रमेश देवरे व सर्व आदर्श शेतकरी उपस्थित होते.यावेळी त्यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.