मागास प्रवर्गातील पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम करा

0

भडगाव (प्रतिनिधी) : राज्य सरकारने पदोन्नती मध्ये मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याच निर्णय घेतला आहे.हे आरक्षण कायम करावे या मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशाने राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष एस डी खेडकर यांच्या नेतृत्वात भडगाव तहसील कार्यालय समोर निदर्शनं आदोलन करून तहसीलदार सागर ढवळे यांच्या सह पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.

महविकास आघाडी सरकारचा 7 मे 2021 चा शासन निर्णय हा संविधान विरोधी असून मागासवर्गीय समाजावर अन्याय आहे.सर्वोच्य न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्यासंधर्भात चा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकार ला दिला आहे त्या नुसार मंत्रिमंडळ उपसमितीने  33 टक्के जागा राखीव केल्या होत्या मात्र राज्य सरकारने तडका फडकी निर्णय घेऊन पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला हा मागासवर्गीय समाजावर अन्याय आहे म्हणून राज्य सरकारने घेतलेला निर्णय मागे घेऊन आरक्षण कायम करावे अशी मागणी केली आहे.

आंदोलन करते वेळी तालुका अध्यक्ष एस डी खेडकर,युवा अध्यक्ष देवा बाविस्कर ,गुरुदास भालेराव,संजय मोरे,भैया बाविस्कर, परमेश्वर सुर्यवंशी  रवी राखुंदे, तौशोब शेख ,रंगा फासगे,पिरा राखुंडे,समाधान खरे, यांच्या सह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.