मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण पुर्ववत करणेसाठी लहुजी संघर्ष सेनेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

0

पाचोरा (प्रतिनिधी) : शासनाने दि. ७ मे २०२१ रोजी परिपत्रक काढून मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले आहे. हा मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उघड – उघड अन्याय आहे. एकीकडे सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मात्र मागासवर्गीयांना असलेले आरक्षण रद्द करण्यात आले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार नेहमी सामाजिक न्यायाची भूमिका घेत असतांना मागासवर्गीय समाजा विषयी अशा स्वरुपाची अन्याय कारक भुमिका या सरकारने का घेतली आहे ? असा प्रश्न राज्यातील मागासवर्गीय समाजाला पडला असुन शासनाने या विषयी योग्य निर्णय घेवुन दि. ७ मे २०२१ चे परिपत्रक रद्द करुन मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण पुर्ववत करावे. अन्यथा लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने राज्यभर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशा आषयाचे निवेदन लहुजी संघर्ष सेनेतर्फे पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद कचरे पाटील यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी लहुजी संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष नाना भालेराव, उपाध्यक्ष किशोर मरसाळे, शहर अध्यक्ष गोपाल अहिरे, गोवर्धन जाधव, मधुकर अहिरे, पांडुरंग अवघडे, चेतन चव्हाण उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.