भुसावळ 24 –
येथील बालाजी लॉन जवळील रहिवासी सौ.विजया नारायण वाणी या महिलेला रात्री ट्रॅक्टर चालकाने धडक देऊन पळ काढणार्या बाजारपेठ पोलिसांनी पकडल्याची घटना घडली असून महिलेस उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,बालाजी लॉन जवळील रहिवासी सौ.विजया नारायण वाणी ही महिला रात्री 11:40 वाजेला घरी जात असतांना समोरून येणार्या एम.एच.43 वाय.8688 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्या महिलेच्या प्लसर दुचाकी क्रमांक एम.एच.19 सी.बी.9645 या वाहनास बालाजी लॉन जवळ धडक देऊन पाच किलो मीटर अंतरावर ट्रॅकर चालक पळून गेल्याने त्याचा पाठलाग करून दिपनगर जवळील हॉटेल वेस्टनला आपले ट्रॅकर ट्रकच्या मधोमध लावून हॉटेल मध्ये लपून बसलेल्या चालकास ए.एस.आय. तस्लिम पठाण यांनी खाकी दाखवितात तो समोर आला त्या ट्रॅकर मालकास फोनव्दारे झालेल्या घटनेची माहिती दिली असून पामतेलाने भरलेले ट्रॅकर हॉटेल वेस्टन वर लावलेले आहे.ट्रॅकर मालकास बाजारपेठ पोलीस स्टेशनला बोलविण्यात आलेले आहे.तर चालकास बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.ही कारवाई ए.एस.आय तस्लिम पठाण, हे.कॉ. जयराज खोडपे व दोन होमगार्ड यांनी केली.तसेच जखमी महिलेस भुसावळ येथील मुकेश पवार, पवन सपकाळे यांनी घटनास्थळी पोहचून महिलेस व धडक दिलेल्या वाहणास उचलून जळगाव हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यासाठी सहकार्य केले.बाजारपेठ पोलीस स्टेशनला याबाबत कुठलीही नोंद करण्यात आलेली नसून जळगाव वरून फिर्यादी आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.