भुसावळ ;- शहरातील शांती नगर भागातील रविंद्र आत्मराम लोहारे यांचा १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान मोबाईल हरविला होता . प्रीमियर कॉलनीतील महिलेने प्रामाणिक पणे सकाळी 20 नोव्हेंबर रोजी परत केला.
अधिक माहिती अशी की रविंद्र लोहारे हे बाहेर गावी जात असतांना त्यांचा मोबाईल बॅगेतून पडला.घरी गेले असता त्यांनी बँग पाहिली असता मोबाईल न मिळाल्याने त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता गुन्हे शोध पथकातील पो कॉ प्रशांत परदेशी, सचिन ढाकणे,विनोद डोळे अशांनी मिळून शोघ घेत मोबाईल वर कॉल केला असता तो फोन भुसावळातील प्रीमियर हॉटेल मागील प्रीमियर कॉलनी मधील भाविका दत्तात्रय उतमारे या महिलेने उचलला व सांगितले की फोन मला सापडला आहे . माझ्या जवळ आहे असे ऐकताच बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेस सकाळी फोन घेऊन पोलीस स्टेशनला बोलविले व मिळालेला फोन कुठलीही अपेक्षा न करता रविंद्र लोहारे यांना प्रामाणिकपणे परत केला.यावेळी ठाणे अंमलदार महेश चौधरी, प्रभाकर चौधरी,एजाज खाँ पठाण हे उपस्थित होते ,.

