भुसावळ ;- येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता राजेंद्र भामरे यांच्या महिलांविषयी सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबई येथील महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन मोरे,अध्यक्ष अशोक खरात यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्षा संगिताताई वाघ यांनी सौ. संगिता भामरे यांची जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी महिला मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे.या निवडीबद्दल त्यांचे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, खान्देश नारीशक्ती संघटना अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष फारुक शेख,जन संघ प्रदेश उपाध्यक्ष संदिप धर्मराज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.